वाल्मीकी रामायणात हनुमानांची कामगिरी अजोड आहे. वास्तविक सुग्रीव वा बिभीषण यांना श्रीरामांपासून काहीतरी लाभाची अपेक्षा होती. पण हनुमानांना मात्र श्रीरामांपासून कोणत्याही वैयक्तिक लाभाची अपेक्षा नव्हती. त्यांनी जे कार्य केले आहे ते केवळ स्वामीकार्य म्हणून. हनुमानांनी उत्कृष्ट सेवेचा आदर्श ठेवला आहे.
वाल्मीकिरामायणात हनुमान दृष्टीस पडतात ते किष्किंधाकांडापासून. कबंधाने सांगितल्याप्रमाणे श्रीराम ऋष्यमूक पर्वतावर सुग्रीवाचा शोध घेत आले. कारण त्यांना सुग्रीव सीताशोधात मदत करणार होता. सुग्रीव हा वालीचा धाकटा भाऊ. वालीने सुग्रीवाला राज्यातून हाकलून लावले होते. त्यामुळे तो आपल्या सहकारी ५ मंत्र्यांसमवेत ऋष्यमूक पर्वतावर रहात होता. राम व लक्ष्मणांना लांबूनच येतांना पाहून तो अतिशय घाबरला. त्याला वाटले की यांना बहुधा वालीनेच आपल्याला मारण्यासाठी पाठवले असावे. तेव्हा बोलण्यामधे जाणकार हनुमानांनी त्याची समजूत काढली. वाल्मीकींनी हनुमानांना ‘वाक्यकोविद:’ असे विशेषण वापरले आहे. वास्तविक वाली ऋष्यमूक पर्वतावर शापामुळे येऊ शकत नव्हता. तरीसुद्धा श्रीरामांना पाहून सुग्रीवाचे घाबरणे म्हणजे वानरोचित चपलताच प्रकट करणे आहे असे हनुमानांना वाटत होते. वास्तविक राजाने कसे असले पाहिजे ? हनुमान सांगतात -
बुद्धिविज्ञानसम्पन्न इङ्गितै: सर्वमाचर । न ह्यबुद्धिं गतो राजा सर्वभूतानि शास्ति ह ॥४-२-१८॥
“बुद्धि व विज्ञानाने संपन्न होऊन आपण दुसर्याच्या कृतिद्वारा त्यांचा मनोभाव जाणावा व त्यास अनुसरून सर्व आवश्यक कार्य करावे. कारण की जो राजा बुद्धिबलाचा आश्रय घेत नाही तो संपूर्ण प्रजेवर शासन करू शकत नाही.” परंतु श्रीरामांचे देवोपम रूप पाहून सुग्रीवाला वाटत होते की नक्कीच त्यांना वालीने पाठवलेले असावे. कारण वाली स्वत: तिथे येऊ शकत नसल्यामुळे त्यानेच कपट वेश धारण केलेल्या या दोन वीरांना आपल्याला मारण्यासाठी पाठवेलेले असावे. तेव्हा त्यांच्या बद्दलची माहीती काढण्यास सुग्रीवाने हनुमानांचीच योजना केली व त्या दोन्ही पुरुषांच्या हालचालीवरून, रूपावरून व संभाषण करण्याच्या पद्धतीवरून त्या दोघांचा यथार्थ परिचय प्राप्त करून घेण्यास सांगितले. त्यांचा मनोभाव जाणून त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास उत्पन्न करण्यास सांगितले. कारण सुग्रीवाला त्याच्या मंत्र्यांमधे हनुमानच हे कार्य उत्तमप्रकारे करू शकतील अशी खात्री होती.
वायुपुत्र हनुमानांनी विचार केला की आपल्या या कपिरूपावर कुणाचा विश्वास बसू शकणार नाही. म्हणून ते सामान्य भिक्षूचे रूप धारण करून राम व लक्ष्मणांजवळ गेले व त्यांनी त्यांची प्रशंसा केली व त्यांच्याबरोबर मधुर वाणीत वार्तालाप करण्यास सुरवात केली. कोणत्याही मनुष्यास त्याच्या रूपाची, बलाची प्रशंसा केलेली आवडते. हा सामान्य नियम लक्षात घेऊन हनुमानांनी श्रीराम व लक्ष्मण यांच्या रूपाची व बलाची प्रशंसा केली व त्यांना पंपासरोवराकडे येण्याचे कारण विचारले. आपण सुग्रीवाचे मंत्री असून सुग्रीवाच्या सांगण्यावरून येथे आलो आहोत व सुग्रीव आपल्याशी मैत्री करू इच्छितात हेही त्यांनी स्पष्ट केले. आपण वायुपुत्र हनुमान असून आपल्या इच्छेप्रमाणे कोठेही जाऊ शकतो व कोणतेही रूप धारण करू शकतो अशी आपल्या सामर्थ्याचीही त्यांनी ओळख करून दिली.
सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:
Post a Comment